बातम्या

दलित कार्यकत्यांस तोडफोडीच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्या प्रकरणी पोलिसांवर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी

 
वास्तव संघर्ष
पिंपरी – भीमा कोरेगाव हिंसा दंगल प्रकरणी १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिमसैनिकावर बेसावधपणे भ्याड हल्ला करण्यात आला होता, यावेळी अमानुषपणे आंबेडकरी समाजातील लहान मुले, महिला ,वृद्ध यांना मारहाण केली व त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या.

याचे पडसाद देशभर पडले होते. झालेल्या घटनेचा निषेध करत यामागील सूञधार मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना शिक्षा करण्याची मागणी होत होती.
दरम्यान सभेद्वारे निषेध मोर्चा पिंपरीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे झाला होता माञ या चौकात पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठलीही हिंसा तोडफोड झाली नाही. तरीदेखील पोलीस येथे जमलेल्या दलित कार्यकत्यांस तोडफोडीच्या खोट्या गुन्ह्यात का अडकवत आहेत असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सुरेश निकाळजे यांनी केला आहे.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना दिलेल्या निवेदनात निकाळजे म्हणतात ‘आम्ही पिंपरी चिंचवड मधून संवैधानिक मार्गाने २ व ३ जानेवारी ला आंदोलन केली होती व संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे वर पहीला गुन्हा पिंपरी पोलीस स्टेशन ला नोंद केला व शांततेने रास्ता रोको आंदोलन पिंपरी आंबेडकर चौक या ठीकाणी केले .

त्या दोन दिवसाच्या आंदोलनात मी स्वता जमावास शांत राहण्याचे आव्हान करत होतो हे आंबेडकर चौकातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत असेल .त्या दोन दिवसातील आंदोलनास बंदोबस्तासाठी तत्कालीन पोलीस उपायुक्त झोन 3 चे गणेश शिंदे साह्ययक पोलीस आयुक्त सतिश पाटील ,पिंपरी पोलीस स्टेशन चे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर हे त्याठीकाणी समक्ष हजर होते .

तरी तब्बल ११ जणांना या खोट्या गुन्ह्यात गोवले जात आहे सदरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तोडफोड करताना आम्ही  नाही व.पो.नि. विवेक मुगळीकर हे जातीय मानसिकतेतुन दलितांवर गुन्हा दाखल करत आहेत. म्हणुन एका आंबेडकरी चळवळीतील दलित कार्यकत्यास खोट्या तोडफोड गुन्ह्यात गोवल्या प्रकरणी अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करावा व चौकशी चालु असे पर्यंत त्यांना निलंबीत करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Share this: