ट्रॅफिक पोलिसांने तरुणीचा बळजबरीने पकडला हात, गाडीची चावीही हिसकावली


फतेहाबाद – पोलीस वर्दीचा काही पोलिसांना कीती गुर्मी असते हे फतेहाबाद याठीकाणी घडलेल्या घटनेमुळे कळतं,  ट्रॅफिक चेकिंग करताना एका पोलीस उपनिरीक्षकाने मोटारसायकल असलेल्या तरुणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक हरियाणा येथील फतेहाबाद येथे हा प्रकार भरदिवसा आणि भर रस्त्यावर झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या अधिकाराचा चुकीच्या पद्धतीने वापर करत  बळजबरीने तरुणीचा हात धरला. त्यानंतर जबरदस्तीने तिच्या हातातून मोटारसायकलची चावी हिसकावून घेतली. तरुणीने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. इंद्राज असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलिस याप्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले.    
यासंदर्भात तरुणीने सांगितले की,
मी बाजारात गेले होते. दरम्यान रस्त्याच्या कडेला मोटरसायकल उभी करुन बाजारात असता पोलीस उपनिरीक्षक इंद्राज आपल्या येथे पोहचला. इंद्राज तिथे पोहचल्यानंतर रस्त्याच्या कडेवर उभी असलेली मोटरसायकल चोरीची असल्याचा दावा करत गैरवर्तन करु लागला. मी जाब विचारला असता इंद्राजने हातून चावी हिसकवण्याचा प्रत्यन केला.
पोलिस याप्रकरणी संबंधित उपनिरीक्षकाची चौकशी करणार असून दोषीवर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती डीएसपी उमेद सिंग यांनी दिली आहे.     

Share this: