धक्कादायक : तळेगाव येथे सव्वा कोटी रूपयांचे गौमास पकडले

धक्कादायक : तळेगाव येथे सव्वा कोटी रूपयांचे गौमास पकडले तळेगाव – दाभाडे याठीकाणी पोलिसानी मोठी कामगिरी केली आहे मुंबई ला जाण्यासाठी निघालेल्या २ कंटेनर ट्रकला पकडण्यात आले आहे.
दरम्यान या ट्रकमध्ये १४ टन बिफ पकडले आहे, संगमनेर वरून मुंबई बंदरावर संबंधित ट्रक जात होते, तेथून जॉर्जिया ला बीफ निर्यात होणार होते, बाजार मूल्यानुसार सदर मालाची किंमत सव्वा कोटी रुपये आहे तळेगाव दाभाडे येथे २५ टन गौमांस पकडण्यात यश आले आहे.

शनिवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता २० टन गौमांस घेऊन ट्रेलर गाडी क्रमांक MH 43 E 6458 हैद्राबाद वरून मुंबई मार्गे विदेशात ( जॉर्जिया ) येथे चालला होता , उर्से टोल नाका येथे पोलिसांनी सापळा रचून गाडी पकडली , आज रविवार २३ डिसेंबर रोजी सकाळी ६:०० वाजता गाडी क्रमांक (MH 17 BY 0922) ही संगमनेर वरून मुंबई च्या दिशेने जात असताना तळेगाव उर्से टोल नाक्यावर शिवशंकर स्वामी ( मानद पशुकल्याण अधिकारी ) यांनी पोलिसांच्या मदतीने पकडली त्यामध्ये ६ टन गौमांस पकडण्यात आले. त्यावेळी गौरक्षण समितीचे आणी बजरंग दलाचे शिवशंकर स्वामी , संदेश भेगडे , गौरव पाटील , सचिन जवळगे , शिवांकुर खेर , योगेश ढोरे , प्रतीक भेगडे , गौरव विटे , अभिजित चव्हाण , श्रीकांत कोळी , प्रणव दाभाडे , अक्षय कुडलकर , भास्कर गोलिया आदि बजरंगिनी गौरक्षण केले..

तसेच डॉक्टर रुपाली धडके ( LDO पशु वैद्यकीय आधिकारी , तळेगाव दाभाडे ) यांनी गौमांसाचे नमुने तपासणी करिता फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवले.

Share this: