मोक्याच्या काळात खडसेंना पक्षाने खड्यासारखे बाजूला केले. म्हणून खडसेंनी काँग्रेसमध्ये यावे – पाटील

वास्तव संघर्ष – ’कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरुपी तेथे राहत नाही’  असे विधान माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काढून त्यांच्या भाजप पक्षत्यागाच्या चर्चेला रंगू लागल्या आहेत आहे. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे आयोजित लेवा समाजाच्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी एकनाथ खडसे यांनी हे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी एकनाथ खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावरुन वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे भाजप पक्ष राज्यात वाढला. मात्र, पक्षाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. मोक्याच्या काळात खडसेंना पक्षाने खड्यासारखे बाजूला केले. हा एकप्रकारे आपल्या समाजावर अन्याय आहे. म्हणून खडसेंनी काँग्रेसमध्ये यावे, असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

खडसे यांनी डॉ. पाटील यांच्या आवाहनाला उत्तर देताना पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले की, कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी बसत नाही. आपल्यावर अन्याय झाला तेव्हा वेळीच त्याचा प्रतिकार देखील करायला हवा. तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते. मात्र, उल्हास पाटील यांच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही, असेही खडसे म्हणाले. त्यांच्या या विधानाचा राजकीय वर्तुळात नानाप्रकारे अर्थ लावला जात आहे. खडसेंनी यापूर्वी वेळोवेळी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. आता पुन्हा त्यांनी असे विधान केल्याने खडसेंच्या नाराजीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

Share this: