बातम्या

भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे


वास्तव संघर्ष – भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. हा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे असणार आहे.

३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत विजय स्तंभाच्या जागी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विजय स्तंभास ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी भेट देत असतात .

त्यामुळे या पूर्वनियोजित कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी विजय स्तंभ परिसराच्या जागेचा ताबा मिळण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रम पार पाडल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जागा पुन्हा होती तशी करुन देण्यात येणार असल्याची हमी राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली. ही विनंती मान्य करत न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही जागा राज्य सरकारकडे सोपवली आहे..

मागील वर्षी भीमा – कोरेगाव परिसराजवळ झालेल्या दंगलीच्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या देखरेखीत सगळा कार्यक्रम पार पडणार आहे.

Share this: