भीमा कोरेगावला जाणार म्हणजे जाणार मज्जाव केला तर पायी जाणार – चंद्रशेखर आजाद


वास्तव संघर्ष
मुंबई : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आज मालाडच्या हॉटेलच्या बाहेर त्यांना नजरकैदेतून सोडण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझाद यांची काल वरळीच्या जांबोरी मैदानात सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. शिवाय सर्व पोलीस स्टेशनवर अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उद्या पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या व्याख्यानालाही परवानगी नाकारली.

दरम्यान दुपारी रविवार १ वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर आझाद यांची सुटका करण्यात आली आहे.बाहेर आल्यानंतर माध्यमाशी बोलताना आझाद म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मला भाषण करण्याचा अधिकार दिला आहे माझ्या व्यक्ति स्वातंत्र्यवर भाजप आणि मोदी सरकार गदा आणत आहे, मला रोखण्याचा कितीही प्रयत्न करा मी चैत्यभूमीत बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पुण्यातील भीमा-कोरेगाव याठीकाणी जाणार म्हणजे जाणारच मला गाडी घेऊन जाण्यास मज्जाव केला तर मी पायी पैदल लाॅग मार्च काढून भीमा-कोरेगावला जाणार असेही आझाद म्हणाले त्यांनी यावेळी दंगलीचे गून्हे असलेला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेला परवानगी दिली जाते मग मला का नाही असा प्रश्न निर्माण केला.

पोलिसांनी आपल्याला रूममध्ये बंद करून ठेवले आहे, अशा आशयाचा चंद्रशेखर आझाद यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारला हे महागात पडेल. . मोदी सरकारने हे युद्ध सुरु केले असून याचा अंत भीम आर्मी करणार, असा इशाराही आझाद यांनी या व्हिडीओत दिला आहे. दरम्यान मुंबई पोलीस आझाद यांना विमानात बसवून देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा नियोजित होत्या. त्यातील पहिली सभा 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता होणार होती. त्यानंतर 30 डिसेंबरला पुण्यात सभा, 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 2 जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर 4 जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम होता.

Share this: