राज ठाकरे यांच्यावर फेसबुकवर टिका पडली महागात, ५० उठाबशा काढण्याची मिळाली शिक्षा 

पुणे 

पुणे – फेसबुक या सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील मनसैनिकांनी ५० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.या तरुणाला तू मराठी मुलगा आहेस म्हणून फक्त उठाबशा काढायला लावल्या नाहीतर खळखट्ट्याक केले असते असे म्हणताना मनसैनिक आहेत.

तसेच त्याला ‘राज ठाकरे यांचे नाव घेत त्यांची जाहीर माफी मागायला सांगितलं, मनसे अधिकृत वृत्तात या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या व्हिडीओ वर त्या तरुणाने माफी देखील मागितली आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर फेसबुक या सोशलमिडीयावर टिका केल्याने या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे, तब्बल ५० उठाबशा काढताना त्याचा दमछाक होताना या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. यापुढे सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोणी आक्षेपार्ह शब्दात टीका केली तर त्याला अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे.

पुण्यातील एका तरुणाने फेसबुक या सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. मनसैनिकांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो पुण्यात राहत असल्याचे उघड झाले. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी त्या तरुणाच्या घरी पोहोचली. मनसैनिकांनी त्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला ५० उठाबशा काढायला लावल्या. यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.

Share this: