बातमीचा इम्पॅक्ट :अखेर निगडी भक्ती शक्ती समुह शिल्प उद्यानात लाईट शो

 

वास्तव संघर्ष मध्ये बातमी प्रसिद्ध केल्यानंतर भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांच्या मागणीला यश आले आहे

 

 

पिंपरी (वास्तव संघर्ष ) – निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात “शिवसृष्टी” तर लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारकात “साहित्यसृष्टी” उभारण्याची मागणी निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करत सक्षम पाठपुरावाही केला होता याचीच दखल घेत भक्ती शक्ती उद्यानात विद्युत रोषणाई व ध्वनीच्या माध्यमातुन “हायटेक शिवसृष्टी” म्हणजेच लाईट शो साकारण्यात येणार आहे.

 

निगडी भक्ती शक्ती समुह शिल्प उद्यानात लाईट शो सुरू करण्याबाबत नुकतीच आयुक्त हर्डीकर, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि पालिकेचे प्रशासन अधिकारी यांनी याठिकाणी भेट दिली. विद्युत रोषणाई व उत्कृष्ट ध्वनीमुळे निगडी व प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहराच्या सौंदर्यात व वैभवात चांगलीच भर पडणार आहे. रोटरी उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटरचे काम सध्या सुरू आहे, निगडीपर्यंत मेट्रो, देशातील सर्वात उंच भारतीय ध्वज, भक्ती शक्ती समुह शिल्प, साठे स्मारक याच बरोबर मल्टीमोर्डल ट्रान्स्पोर्ट हॅब यामुळे हा चौक पर्यटन स्थळ होणार असुन लाईट शो मुळे याच्यात अजुनच चांगली भर पडणार आहे. हा लाईट शो १५ ते २० मिनिटांचा असुन त्यातुन पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

 

याबाबत निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे म्हणाले की, “भक्ती शक्ती समुह शिल्प व साठे स्मारकात शिवसृष्टी व साहित्यसृष्टी व्हावी यासाठी आयुक्तांकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करत प्रशासनाला याचे महत्व पटवून दिल्यामुळे आयुक्तांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला, विद्युत रोषणाई व ध्वनीच्या माध्यमातुन शिवसृष्टी उभा राहणार आहे या “लाईट शो” तयार करण्याचे काम उत्कृष्ट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना देण्यात येणार आहे, त्यामुळे या महत्वपुर्ण मागणीला यश आले असुन शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने हा आनंदाचा क्षण आहे”.

Share this: