बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मी भाजपसोबत ताठ मानेने काम करतो,कुणालाही भुलथापा देत नाही-रामदास आठवले


पिंपरी (वास्तव संघर्ष ) – मी भाजपा सोबत असलो तरी ताठ मानेने तेथे काम करत आहे, मी कुणालाही भुलथापा देत नाही असे मत केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन च्या कार्यक्रमास संबोधीत करताना बोलत होते . यावेळी खासदार अमर साबळे, रिएफचे विनोद चांदमारे रिपाइंचे अविनाश म्हातेकर, चंद्रकांता सोनकांबळे, अरिफ शेख, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, बाळासाहेब भागवत अजिज शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले यांनी यावेळी म्हणाले की, ज्या क्राँग्रेसने मला अपमानास्पद वागणूक देऊन मला बंगल्याबाहेर बाहेर काढले त्या कॉंग्रेसला मी त्यांची जागा दाखवून दिली आणि मी जिथे जातो तिथे सत्ता येते, भाजप-शिवसेनेची लोकसभेला युती झाल्यास रिपाइंला दोन जागा द्याव्यात, युती न झाल्यास मात्र चार जागांची मागणी करणार आहे. त्यात दक्षिण मुंबई, विर्दभातील रामटेक, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि उदयनराजे रिपाइंत आले तर सातारा अशा चार जागांवर आम्ही दावा केला आहे.

Share this: