माझं पिंपरी -चिंचवड

प्रेत ठेवलेल्या बैलगाडीची प्रतिकृती दिली भेट

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या अत्यंविधीचा खर्च महापालिकेमार्फत करण्याचा ठराव झालेला असताना त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्त शिवसेनेच्या वतीने कर संकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांना प्रेत ठेवलेल्या बैलगाडीची प्रतिकृती देऊन प्रशासनाचा निषेध केला आहे.

 

यासंदर्भात शिवसेना संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक, अहमदनगर, मुंबई, कोल्हापूर या महापालिकेकडून तेथील नागरीकांच्या अंत्यविधीचा खर्च केला जातो. त्या धर्तीवर नागरीकांच्या अत्यंविधीचा खर्च करण्याचा ठराव पिंपरी महापालिकेत केला आहे. मात्र, त्याची अमलबजावनी केली जात नाही. त्यामुळे गोर गरीब सर्वसामान्य जनतेला अंत्यविधीच्या वेळी आर्थिक आडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या २१ दिवसांच्या आत हा ठराव आमलात आणावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने महालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा दाखले यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे

Share this: