माझं पिंपरी -चिंचवड

कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकारणात आपल्या वारसदारांना पुढे आणत असताना आम्ही घरा घरात योजना आणल्या – पंकजा मुंडे 

पिंपरी (वास्तव संघर्ष ) आई मुला मुलींचे कौतुक करतेच, परंतू वडीलांनी मुलीला सन्मान दिला तर तिचा आत्मविश्वास वाढतो. आई वडीलांनी मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हा बहिनींना स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी पहिल्यापासूनच सन्मान दिला. महिला या आई, लक्ष्मी, सरस्वती, शक्तीचे रुप आहे. महिलांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी निर्मला सितारामण यांच्यावर सोपविली आहे. असे प्रतिपादन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भोसरी येथे केले.

शिवांजली सखी मंचने संयोजन केलेल्या आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चे उद्घाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भोसरीत शुक्रवारी (दि. ८फेब्रुवारी) करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, निमंत्रक आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, संयोजिका पूजा महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, भाजप शहर प्रवक्ते अमोल थोरात, भाजपा प्रदेश महिला कमिटी सचिव उमा खापरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्विनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे,‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा भीमाताई फुगे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा नम्रता लोंढे आदींसह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. आदींसह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, समाजातील वंचित घटकांचा विकास करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. राज्यात प्रथमताच ग्रामविकास खाते माझ्या सारख्या महिलेला मिळाले. त्यामुळे मी खेडो पाड्यांतील महिलांच्या डोक्यावरची घागर बंद केली, गावं हगणदारी मुक्त केली, गावागावात वाड्यावस्तींवर पाणी नेले, बचत गटांची उत्पादने अमेरिकेत नेली, कर्ज माफीसाठी मोर्च निघत असताना महिला बचत गट प्रामाणिकपणे कर्ज फेडत असल्याचे दिसते. त्यामुळे महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला. त्यामुळे महिला आता स्वाभिमानाने व्यवसाय करु लागल्या आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकारणात आपल्या वारसदारांना पुढे आणत असताना आम्ही घरा घरात उज्ज्वला योजना, घरोघरी शौचालय, सौभाग्य योजनेतून घर तेथे वीज, बेघरांना घर देण्याचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवून देशाचा विकास करीत आहोत. पूजा लांडगे यांनी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या नावे महिलांना दिलेले पुरस्कार कौतुकास्पद आहेत. आमदार महेश लांडगे हे भाजपा बरोबर आहेत. त्यांना बरोबर घेऊनच शहरात भाजपाची ताकद वाढविणार आहोत. असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आमदार महेश लांडगे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शिवांजली सखी मंचच्या वतीने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांमधील अंगभूत गुणकौशल्य विकसित व्हावेत यासाठी कला, क्रिडा, संस्कृती, उद्योजकता, रोजगार, आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. ११ फेब्रुवारी २०१९ महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.

यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते सहाय्यक पोलिस आयुक्त निलम जाधव, डॉ. तुप्ती देसाई, डॉ. सुजाता गायकवाड, ॲड. कविता स्वामी, सुमनताई पवळे, मंदाकिनी ठाकरे, सुखदेवी नाटेकर, गिरीजा लांडगे, विद्या पाटील, ओवी सातपुते, सुरेखा सुकाळे, सत्यभामा देशमाने, ज्योती पठाणीया, शुभांगी शिंदे, सारिका पवार, पूनम गोसावी, जोत्स्ना कासार, राजश्री घागरे, यशोदा पवार, स्मिता काळे, नेत्रा तेंडुलकर, अंकिता नगरकर, रत्ना पाटील, सुमन सहाणे, पुष्पा ढगे, ब्रम्हाकुमारी करुणा बहनजी, निलिमा साकोरे, सविता साळुंखे, अक्षता पाताडे, यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

Share this: