मी जात पात मानत नाही,त्यामुळे जातीचे नाव काढणाऱ्याला मी ठोकून काढेन-नितीन गडकरी

पिंपरी – (वास्तव संघर्ष)चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमच्या वतीने पारधी समाजातील तरूणांना गायींचे वाटप गडकरींच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते ते म्हणाले, जातीचे नाव काढणाऱ्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढली जात नाही. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे, असेही नितीन गडकरी म्हणाले

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, गिरीश प्रभुणे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी आदी उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले की, सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा करून ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल, त्या दिवशी आपले कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आत्मचिंतनात दिलेला आहे. त्यामुळे मी जात पात मानत नाही,येथे किती पाळतात हे मला माहीत नाही. मात्र, आमच्या येथे बंद केली आहे.

जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणालाही छोट्या आणि मोठ्या जातीचा न म्हणता एकात्म आणि अखंड असा समाज तयार व्हावा, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त

जातीचे नाव काढणाऱ्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढली जात नाही. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.

चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमच्या वतीने पारधी समाजातील तरूणांना गायींचे वाटप गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, गिरीश प्रभुणे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी आदी उपस्थित होते.

यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा करून ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल, त्या दिवशी आपले कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आत्मचिंतनात दिलेला आहे. त्यामुळे मी जात पात मानत नाही,येथे किती पाळतात हे मला माहीत नाही. मात्र, आमच्या येथे बंद केली आहे.

जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणालाही छोट्या आणि मोठ्या जातीचा न म्हणता एकात्म आणि अखंड असा समाज तयार व्हावा, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त

Share this: