बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भररस्त्यात हाणामारी पहा व्हिडीओ 

वास्तव संघर्ष आॅनलाईन

यवतमाळ – जिल्ह्य़ातील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भररस्त्यात कडाक्याचं भांडण झाले आहे. सदरील घटना दि १२ फेब्रुवारी ला आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किक्रेट सामन्यादरम्यान झाली राञी दहाच्या सुमारास त्यांच्या दोन्ही पत्नी मध्ये प्रथम वाद झाला आणि नंतर हा वाद हाणामारी पर्यत पोहचला..

सविस्तर वृत्त असे कि, आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त किक्रेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. हे सामने पांढरकवडा येथील वाय पॉईंट परिसरात झाले. त्यादरम्यान तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. पण पहीली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीसोबत का रहात आहे यावरून दोघींमध्ये वाद झाला हा वाद विकोपाला जात दोघींमध्ये हाणामारी झाली. नंतर सदरील प्रकरण पोलिसात गेलं नंतर काय झाले ते अजून तरी समजले नाही..

भाजपच्या कार्यकर्त्या प्रिया नावाच्या दुसऱ्या पत्नीसोबत तोडसाम गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत. पहिली पत्नी असूनही राजू तोडसाम प्रिया नावाच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत. तोडसाम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरा विवाह करुन तिच्याशी संसार थाटला. गेल्या काही वर्षांपासून पहिली पत्नी त्रस्त होती.

या विषयावरुन काल दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होऊन हाणामारी झाल्याची माहिती आहे. पहिली पत्नी  नातेवाईकांसह कार्यक्रम ठिकाणी आली आणि मग दोघींमध्ये हाणामारी झाली.

Share this: