व्हिडीओ :पिंपरीत रविवारी होणार धनगर समाजाचा महामेळावा


पिंपरी (वास्तव संघर्ष )
धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणा संदर्भात सरकारचे डोळे उघडण्यासाठी सकल धनगर समाज, पिंपरी-चिंचवडच्या वतीने येत्या रविवारी १७ फेब्रुवारी ला पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, सरकारकडून टोलवाटोलवी सुरू आहे. धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यास सरकार वेळकाढूपणा करीत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यभरातील धनगर समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

Share this: