बातम्यामहाराष्ट्र

छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांचा लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार?

 

मुंबई (वास्तव संघर्ष ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये नाशिकमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता छगन भुजबळ आणि ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. मात्र, या दोघांनीही निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षाने धरला आहे.

ठाण्यातून आपला मुलगा संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी गणेश नाईक यांनी पक्षाकडे केली आहे. तर छगन भुजबळ यांनी नाशिकमधून आपले पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे

Share this: