माझं पिंपरी -चिंचवड

भोसरी गावजञा मैदानावर उद्या राष्ट्रवादीचा मेळावा, दिग्गजांसह अमोल कोल्हे राहणार उपस्थित

भोसरी (वास्तव संघर्ष)
आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिरूर मतदार संघात राष्ट्र्वादीचें संभाव्य उमेदवार विलास लांडे असतील की शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील की प्रचारक असतील याची उत्तरे भोसरी गावजञा मैदानावर मंगळवार दि. ५ रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत कळेल का याची उत्कंठा शिरूरवासियांना होत आहे.

याबाबत पञकार परिषदेत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिलेली माहिती अशी की भोसरी गावजञा मैदानावर मंगळवार दि ५ रोजी सायंकाळी सहा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share this: