छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, गावात अघोषित संचारबंदी लागू. 

वास्तव संघर्ष आॅनलाईनबु

लढाणा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या वृत्तानंतर बुलढाणा_तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने अग्निशमन दलाच्या वाहनासह एसटी बस व दुचाकी जाळून टाकली आहे. या घटनेनंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, डोंगरखंडाळा_ येथील बस स्टँडच्या समोर बुधवारी रात्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. या विरोधात आलेल्या तक्रारीनंतर आज सकाळी पोलिसांनी पुतळा हटविण्यास सुरुवात केली. हे करताना पुतळा खाली पडला.

ही घटना कळताच गावात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावानं दगडफेक करत वाहनांची जाळपोळ सुरू केली. दगडफेकीत तहसीलदार सुरेश बगळे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. गावात अघोषित संचारबंदी लागू करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे.

Share this: