तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनवणार-पार्थ पवार

तळेगाव (प्रतिनिधी):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथील बुद्ध विहाराला भेट दिली. यावेळी पार्थ पवार यांनी रखडलेल्या ऐतिहासिक बुद्ध विहाराविषयी माहिती घेतली. हे बुद्ध विहार बनविण्यासाठी येणाऱ्या अडचणी भविष्य काळात सोडविणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी देखील पार्थ पवार यांनी भेट दिली. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू विषयी माहिती घेतली. यावेळी भीम अनुयायांनी पार्थ पवार यांना ही वास्तू विकसित करण्याची मागणी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान हे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन अशी ग्वाही देखील पार्थ अजित पवार यांनी यावेळी भीम अनुयायांना दिली.

तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांना जेवण बनवून देणाऱ्या काशीबाई गायकवाड, माजी नगराध्यक्ष रंजना भोसले, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तळेगाव मध्ये राहण्यास होते त्यावेळी त्यांना जेवण बनवून देणाऱ्या काशीबाई गायकवाड या देखील बाबासाहेबांच्या घरी होत्या. पार्थ पवार यांनी काशीबाई यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या आठवणी देखील काशीबाई यांनी पार्थ पवार यांना सांगितल्या. भविष्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूला राष्ट्रीय स्मारक बनवणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

Share this: