बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

अजित पवार यांचे पुञप्रेम, कडक उन्हात केला पार्थ पवारचा प्रचार

पिंपरी (वास्तव संघर्ष) मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज, रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. भर उन्हात अजित पवार यांचे पुञप्रेम सा-यांनाच दिसत होते.भक्ती शक्ती चौकातील शिवाजी महाराज- संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाला अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागीय झाले आहेत. ‘एकच वादा अजित दादा’ ,’पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.

ही रॅली भक्ती- शक्ती चौकातून निघून निगडी प्राधिकरण, आकुर्डी गावठाण, खंडोबा माळ, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, मोरवाडी, पिंपरीगाव, संत तुकारामनगर, वायसीएम, कासारवाडी, दापोडी मार्गे निघून रोहित काटे यांच्या निवासस्थानी या रॅलीचा समारोप होणार आहे.

Share this: