हे मनोमिलन म्हणजे भ्रष्टाचाराची मांडवली, राष्ट्रवादीचा आरोप

पिंपरी (वास्तव संघर्ष) मावळ मतदार संघाचे युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे निव्वळ स्वार्थापोटी एकत्रित आले आहेत. ‘तु मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो‘, अशीच या दोघांची अवस्था झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.

सोमवारी आमदार जगताप आणि खासदार बारणे यांनी जुने वैर विसरुन मनोमिलन केले. त्याचा समाचार घेताना दोघे विकास कामाकरिता नव्हे तर स्वार्थासाठी एकत्र आले, यांना ‘लाज कशी वाटत नाही’ असा घणाघाती आरोप देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी प्रशांत शितोळे म्हणाले ‘निवडणूक जवळ आली म्हणून त्यांचे मनोमिलन झाले आहे याआधी फोटोतील खासदार हे आरोप त्यांच्यावर आमदारांनी केले होते ते सर्व विसरले का? जनतेच्या प्रश्नावर एकञित आले असते तर योग्य झाले असते माञ बारणे यांचा पराभव दिसू लागल्यावर पिंपरीतील अमर मुलचंदानी यांनीच ही मांडवली केली आहे याला मनोमिलन नाही भ्रष्टाचाराचे मनोमिलन म्हणता येईल असेही ते म्हणाले..

यावेळी विरोधी पक्षनेता दत्ता साने, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बु आसवाणी, विनोद कांबळे होते

Share this: