क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

झोपडपट्टीत राहणाऱ्या १९ महिलांची कर्जाच्या नावावर केली फसवणूक

पिंपरी – चिंचवड शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या व छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांना पैशाची अडचण असते . झोपडपट्टीत रहातात म्हणून त्यांना कर्जासाठी कुणी दारात उभे करत नाही. याचाच गैरफायदा घेऊन भोसरीतील लांडेवाडी झोपडपट्टी भागातील १९ महिलांची एकाने फसवणूक केली आहे .

उमेश वासुदेव वाघमारे (वय ३८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनुसया रामा बाबरे (वय ४६, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बाबरे यांचा चहा टपरीचा व्यवसाय आहे. एक महिन्यापूर्वी उमेश वाघमारे याने त्यांना वल्लभनगर येथील भारतीय महिला नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी १०५० रुपये घेतले. अशा १९ महिलांकडून त्याने पैसे घेतले. मात्र, पुढे काहीही न करता, त्यांना कर्ज मिळवून न देता त्यांची फसवणूक केली.

Share this: