क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मतदान करण्यासाठी पैशाचे अमिष दाखवल्याप्रकरणी माजी आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांना पैशाचे अमिष दाखवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात (दि-२९) रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला पिंपरी लिंकरोड आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी माजी आमदार आण्णा दादू बनसोडे (वय – ५०,राहणार – चिंचवड) तसेच रवींद्र ह्रदयनाथ दुबे(वय – ४६,राहणार – कामगारनगर पिंपरी ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपनिरीक्षक शरद आहेर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनसोडे आणि दुबे हे दोघेजण पिंपरीतील लिंकरोड परीसरात निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांना पैशाचे अमिष दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता यावेळी दोघे जण चार चाकी गाडी असलेल्या स्विप्ट गाडीत बसल्याचे दिसले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता यावेळी मोटारीच्या डीकीमध्ये ४८ हजार ५०० रुपये मिळून आले या पैशासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पिंपरी लिंकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला

Share this: