२३ मे रोजी वंचित बहुजन आघाडीची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल  :प्रकाश आंबेडकर

सोलापूर :लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने स्वबळावर सर्व ४८ जागेवर उमेदवार लढविल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी अन्य कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर समझोता करणार नाही. सर्व २८८ जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची माहिती अॅड प्रकाश आंबेडकर यांनी दिली.सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

आंबेडकर म्हणाले विधानसभा निवडणुका लढविण्याचा मुद्दा स्पष्ट करताना आम्हाला कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करण्याची गरज भासणार नाही, तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये आपण काँग्रेस आघाडीबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळेच लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्यात आल्या. लोकसभेच्या जागांचा निकाल २३ मे रोजी लागेल, त्या वेळी वंचित बहुजन आघाडीची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल, असाही दावा आंबेडकर  यांनी केला. लोकसभेच्या जागा लढवित असतानाच आम्ही आगामी विधानसभेच्याही सर्व २८८ जागा स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आगामी काळात तशी पावले पडतील, असे त्यांनी सांगितले.

Share this: