बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अबब! लाचलुचपत प्रतिबंधकांनी कार्यवाही केलेल्या १९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिकेने पुन्हा कामावर घेतले

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधकांनी कार्यवाही केली होती. महिलांच्या गंभीर तक्रारी आणि फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या या अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांवर पालिकेतील आयुक्तांनी कृपादृष्टी दाखवली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निलंबन समिति शिफारशीनुसार सेवानिलंबित १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा महापालिकेत नियुक्त केले आहे. याबाबत सोमवारी आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधकांनी एकून महापालिकेच्या १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणी अटक केली होती. या कार्यवाही नंतर तब्बल १ वर्षभर हे कर्मचारी महापालिकेत कार्यरत नव्हते माञ त्यांना घरी बसून ७५%वेतन महापालिकेच्या तिजोरीतून दिले जात होते. सोमवारी झालेल्या महापालिका निलंबन आढावा समीतीसमोर त्या कर्मचा-यांना आर्थिक स्वरूपाचे कामकाज न देता जनसंपर्क येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी पुढे देखील सुरु राहणार आहे.

अलका कांबळे (माध्यमिक शिक्षण ), बाबासाहेब राठोड (माध्यमिक शिक्षण ), राजेन्द्र शिर्के (वायसीएम हाॅस्पिटल), तानाजी दाते (आरोग्य ), किशोर शिंगे(मुख्य लेखा परीक्षक ), प्रकाश रोहिकले (झोनिपु), अमोल वाघेरे (पशुवैद्यकीय), उदय वानखेडे आणि अनिल माने(अग्निशामक), रविंद्र कांबळे (क्रिडा विभाग), राजेश रजपूत (उद्यान) सुभाष खरात (भुमी आणि जिंदगी विभाग) निलेश राठोड (उद्यान) शितल चतुर्वेदी (अ क्षेत्रीय) शैलेश जाधव ( तालेरा हॉस्पिटल), सचिन घनवट ( सांगवी हॉस्पिटल),अशी सेवानिलंबन रद्द केलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आहेत.

Share this: