क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

शिवाजी महाराज क्षञीय नसून त्यांचा जन्म हा क्षुद्र जातीचा ;अभिनेत्री पायल रोहतगी बरळली

वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई: काही दिवसांपूर्वी थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर पायल रोहतगी आता पुन्हा बरळली आहे. यावेळी तीने महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले छञपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, त्यांचा जन्म हा क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता, असे वक्तव्य करून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने नव्या वादाला तोंड फोडले आहे. पायलने १ जून रोजी यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. मात्र, राज्याभिषेकासाठी त्यांनी विधिवत मुंज केली आणि आपल्या पत्नीशी पुनर्विवाह केला. यावरून एकच सिद्ध होते की, त्याकाळी जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. तुम्हाला एखादे कौशल्य अवगत असेल तर तुम्ही एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकत होतात, असे पायलने ट्विटमध्ये म्हटले आहे

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1134834382273994752?s=20

पायलने इन्स्टाग्रामवर पती संग्राम सिंगसोबतचा फोटो शेअर करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं? असा प्रश्न विचारत तिने मराठा आरक्षणाविषयीही मुक्ताफळं उधळली आहेत

Share this: