रामदास आठवले यांचे ‘खास’ मिञ  झाले राज्यमंत्री ;शेलार विखे,क्षीरसागर यांच्यासह १३ जणांनी घेतली मंञीपदाची शपथ

महाराष्ट्र- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. राजभवनावर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या एकूण १० , शिवसेनेच्या २ तर आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे खास मिञ अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची  शपथ घेतली. माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदाची लॅाटरी लागली आहे.आज एकूण १३ नव्या मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

उद्या सोमवार पासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राजभवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या सहा तर शिवसेनेच्या दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आरपीआयचे अविनाश महातेकर यांच्यासह भाजपच्या चार जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे मिळाली असून, मुंबईला 3 मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. विदर्भातील डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, तानाजी सावंत, अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्री म्हणून तर परिणय फुके यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. तर मुंबईतून मुंबई भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट तर कांदिवलीचे आमदार योगेश सागर, आरपीआयचे अविनाश महातेकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मराठवाड्यातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील जत भाजपा आमदार सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.पुणे ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय उर्फ बाळा  भेगडे यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख यांच्यासह युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आयोध्येच्या दौ-यावर असल्याने शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते.

आज शपथ घेतलेले मंत्री पुढील प्रमाणे:-
13 जणांमध्ये 8 जण कॅबिनेट मंत्री असतील, तर 5 जण राज्यमंत्री असतील. पाहूया कुणाला कोणत्या दर्जाचं मंत्रिपदं दिले आहे :-

कॅबिनेट मंत्री

1) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – कॅबिनेट मंत्री

2) जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री

3) आशिष शेलार (भाजप) – कॅबिनेट मंत्री

4) संजय कुटे (भाजप) – कॅबिनेट मंत्री

5) सुरेश खाडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री

6) अनिल बोंडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री

7) तानाजी सावंत (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री

8) अशोक उईके (भाजप) – कॅबिनेट मंत्री

राज्यमंत्री

1) योगेश सागर (भाजप) – राज्यमंत्री

2) अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट) – राज्यमंत्री

3) संजय (बाळा) भेगडे (भाजप) – राज्यमंत्री

4) परिणय रमेश फुके (भाजप) – राज्यमंत्री

5) अतुल सावे – भाजप

Share this: