राज्यस्तरीय रिक्षा संप मागे ;आज मुख्यमंत्र्यांसोबत ३ वाजता बैठक

मुंबई-रिक्षा चालक मालक यांच्या अनेक मागण्यासाठी मंगळवार दिं ९ रोजी रिक्षा बंद आंदोलन जाहीर करण्यात आले होते. मात्र नुकत्याच झालेल्या मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्री यांनी रिक्षा संघटना पदाधिकारी यांना बैठकीसाठी निरोप पाठविले असून उद्याचा संप मागे घेण्यात आले असल्याचे रिक्षा संघटनेचे नेते शशांक राव यांनी जाहीर केले आहे.

रिक्षा संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आज दुपारी 3 वाजता बैठकीत बोलावले असून त्या बैठकीत रिक्षा चालक मालक यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याने त्यामुळे आज घेण्यात आलेले राज्यस्तरीय जाहीर केलेले रिक्षा बंद आंदोलन रद्द करण्यात आल्याचे शशांक राव यांनी जाहीर केले आहे.

Share this: