क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्वत:वर छातीत गोळी झाडून तरूणाने केली आत्महत्या;पिंपळे गुरवमधील धक्कादायक घटना

पिंपरी (वास्तव संघर्ष) पुण्याच्या विमान नगर येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने बंदुकातून स्वत:वर छातीत गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. सचिन शिवाजी वांडेकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा त्याचा लहान भाऊ दीपक आणि मित्र विशाल अशोक लहाने हे तिघे जण पिंपळे गुरव येथे एकत्र राहत होते. रविवारी सायंकाळी विशाल हा बाथरूममध्ये होता तर, लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्यात, गोळी झाडल्याचा आवाज आला. आवाज ऐकून दीपक धावत वर आला..
आणि विशाल हा देखील बाथरूमधून धावत बाहेर आला. सचिननं स्वत:वर गोळी झाडल्याचं दीपकच्या लक्षात आले . रक्ताच्या थारोळ्यात भावाला पाहून काय करावे हे दीपकला सुचत नव्हते . त्याने मिञ कामठे ला बोलवून भावाला रुग्णालयात नेले . मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला . सचिनकडे पिस्तुल कोठून आले याची चौकशी पोलीस करत आहेत

Share this: