‘ग’क्षञीय कार्यालय येथे महापौर राहुल जाधव यांच्या समवेत बैठक

पिंपरी-चिंचवड शहर विकासासाठी संबधीत विभागाने पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी उपस्थीत केलल्या समस्याचे त्वरीत निराकरण करून येउन त्याचा अहवाल सादर करावा अशा सुचना महपौर राहूल जाधव यांनी उपस्थीत अधिका-यांना दिल्या.

प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून आज ग प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसदस्या मनिषा पवार, सविता खुळे, सुनिता तापकीर, नगरसदस्य संदिप वाघिरे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, निलेश बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य संदीप गाडे, गोपाल माळेकर, विनोद तापकीर, कार्यकरी अभियंता देवन्ना गट्टुवार, प्रशांत पाटील, गलबले, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधिक्षक रामकृष्ण आघाव, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले तसेच सर्व विभागांचे संबधीत अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी महापौर राहुल जाधव यांनी ग प्रभागातील सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करणे बिगर परवाना नळ कनेक्शन घेतलेल्या नागरीकांवर कारवाई करणे, दुषित पाणि पुरवठा होणार नाही या कडे लक्ष देणे, पाणी पुरवठा पाईप लाइन चुकीच्या टाकणा-या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे, मोटारी लावुन पाणी घेणा-यांवर कारवाई करणे, जुन्या पाण्याच्या पाईप लाइन काढुन टाकुन सुव्यवस्थीत नविन पाईप लाइन टाकणे, मच्छर, डुक्करे, भटकंती कुत्रे, रस्तावरील गुरे, यांचा नागरीकांना होणा-या त्रांसापासुन
संरक्षण देणे. इमारती मधील झाडांच्या मुळाचा उपद्रव वाढलेला आहेत ती झाडे मनपा नियमानुसार काढुन टाकणे, कर्मचारी वर्ग वाढविणे यांच बरोबर महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर जलशुध्दीकरण केंद्र उभारणे अशाही सुचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या.

Share this: