बातम्या

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न..!

पनवेल(वास्तव संघर्ष) महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांच्या वतीने वतीने कुष्ठरोग निवारा समिती, शानंतीवन, नेरे येथे पत्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न झाली. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि तो असायलाच पाहिजे. कोणत्याही पत्रकाराला आपला इतिहास, वर्तमानकाळातील सामाजिक तशाच राजकीय घङामोङि आणि येणा-या भविष्यकाळातील काही अंदाजात्मक गोष्टींची जाण असायला पाहिजे.

पत्रकार म्हणजे असा व्यक्ती ज्याला स्वतःचा आणि समाजाचा अनुभव यांची सांगड घालून निस्वार्थ भावनेने नागरिकांसमोर चांगले वाईट अनुभव मांडता आले पाहिजेत.ज्याला कोणत्याही विषयावर लिहिताना त्या विषयाची सखोल माहिती असायला हवी व कुणाला नसेल तर त्या विषयाची माहिती घेण्याची जिज्ञासा असायला हवी, असे प्रतिपादन सुशिल जाधव यांनी महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांच्या वतीने शानंतीवन, नेरे येथे आयोजित करण्यात पत्रकारांच्या कार्यशाळा प्रसंगी केले.

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांच्या वतीने आयोजित पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांना कायद्याचे ज्ञान आवश्यक असते, यामुळे पत्रकारांनी सतर्क राहून कायद्याचा अभ्यास असावा?तसेच कायद्याचे महत्व या बदल अॅङ.प्रमोद ठाकुर यांनी उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम राबवित असतो,तसेच संघाची भूमिका संघाचे प्रदेशाध्यक्ष ङाॅन एन के.के.यांनी मांडली.संघाचे सल्लागार बाळासाहेब अङागळे यांनी सामाजिक गीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.

मुंबई येथे पावसाचे थैमान चालू असताना,यामुळे विस्कळीत झालेल्या वातावरणात मुंबई व पुणे येथून मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या सदस्यांचे कौतुक संघाचे संस्थापक विजय सुर्यवंशी यांनी केले.तसेच संघांच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद हे संघाचे मोठे यश असल्याचे सांगितले. यावेळी कार्यशाळेत सहभागी सदस्यांना संघांच्या वतीने प्रशस्ती पत्रक देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत वळूज यांनी मानले.ही सुंदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्वांनी संघाचे आभार मानले.

Share this: