बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कडक पाऊल ;प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज वापरल्यास करणार दंडात्मक कारवाई

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज वापराविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कडक पाऊले उचलली आहेत. प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्यास, दुकानदारांनी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

प्लॅस्टिक वापरण्यास राज्य सरकाने २३ मार्च १८ रोजी बंदी घातली आहे. राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध १९७१ च्या तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे ही बाब फौजदारी गुन्ह्यांस पात्र आहे. राष्ट्रध्वजाचा यथोचित दिसल्यास सन्मान होणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन बनविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन, विक्री आणि वापरास प्रतिबंध आहे, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले

Share this: