बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणी येण्यासाठी महापौरांच्या गोळीबारांची वाट बघता काय?

पिंपरी -(वास्तव संघर्ष )पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिले खरे माञ या आदेशाला केराची टोपली पालिकेतील अधिका-यांनी दाखवली आहे.

पवनेचे पुजन महापौर राहुल जाधव यांनी केल्यानंतर अधिका-यांना शहराला दररोज पाणीपुरवठा देण्याचे आदेश दिले माञ पवनेच्या तीरावर महापौरांनी केलेले पुजन आणि दिलेले आदेश अधिकारी विसरले आणि महापौरांनी गोळीबार कसा आणि का केला असावा याचीच चर्चा महानगरपालिका वर्तुळात रंगू लागली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा एकदा शहरवासीयांना पाणी कपातीच्या संकटाला ताेंड देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा येण्यासाठी महापौरांच्या गोळीबारांची वाट बघता काय? अशीच चर्चा शहरातील नागरिक करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी शहरात पाऊस नसल्याने महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व सर्वच अधिकारी, पदाधिकारी यांच्या सहमतीने गेली ५ महिने शहराला दिवसाआड पाणी येईल असा फतवा काढण्यात आला. त्याचे शहरवासियांनी स्वागत केले, मात्र गेल्या महिन्याच्या कालखंडात पावसाने मुसळधार जाेरदार हजेरी लावली आणि शहरातील नागरिकांची पाणी कपात होऊन रोज पाणी पुरवठा मिळेल अशा आशा पल्लवित झाल्या.

पाणीपुरवठा विभागाचे सक्षम अधिका-यांना ५ महिन्याचे दिवसाआड पाणीकपातीचे नियोजन कसे करावे? व कपात रद्द केल्यावर ते नियोजन कसे ?असावे याचे गणितच समजले नाही आणि नागरिकांचं तोडचं पाणी पळालं

दरम्यान दररोज पाणी पुरवठावरून होत नसल्याने विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी देखील संताप व्यक्त केला ते आज पञकारांशी बोलत होते याप्रसंगी काटे म्हणाले, कपातीच्या दरम्यान नागरिकांना खात्री हाेती की,आज नाही उद्या पाणी येणार माञ पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पाणी कपात रद्द, हाेऊनही एक दिवसाआड हाेणारा पाणी पुरवठा ही, हाेऊ शकला नाही.यामध्ये प्रामुख्याने टॅकर लाॅबी असल्याने सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट होत आहे. आता दोन्ही आमदार आणि खासदारांनी एकञ येऊन हा प्रश्न सोडायला हवा माञ ते पण यासाठी प्रयत्न करत नाहीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून विरोधीबाकावर आहोत म्हणून सतत नागरिकांचे प्रश्न मांडतो तर सत्ताधारी भाजप पाण्याच्या चुकीच्या नियोजनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला जवाबदार धरतात सत्ता भाजपकडे आणि नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने करायचे का? असा सवालही काटे यांनी विचारला

Share this: