बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

नागरिकांच्या तीस कोटी रुपयांवर भाजपने टाकला दरोडा ;दत्ता साने यांचा गंभीर आरोप

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील पंचवीस लाख नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी ३० कोटी रुपयाचे डस्टबीन योजना मंजूर केली आहे. मात्र स्थायी समितीत मंजूर केलेल्या याच योजनेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मा. विरोधीपक्षनेते दत्ताकाका साने यांनी आज गंभीर आरोप केले ते आज पञकारांशी बोलत होते.

यावेळी साने म्हणाले, ३० कोटी रुपयांची डस्टबीन योजना स्थायी समितीत मंजूर केली. मात्र ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी याची आवश्यकता सध्या शहराला नाही आणि शहरातील नागरिकांची तशी मागणी देखील नाही. आज शहरात पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा नियमित होत नाही. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी शहरातील नागरिकांची परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप काही पैशांच्या टक्केवारीसाठी डस्टबीन योजना राबवत आहेत.

दरम्यान, स्थायी समिती भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे नागरिकांच्या कर स्वरुपात आलेल्या ३० कोटींवर यांनी दरोडा टाकला आहे असा गंभीर आरोप देखील यावेळी दत्ताकाका साने यांनी लावला. त्याबरोबर ,डस्टबीन खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला असला, तरी अद्याप आयुक्तांकडून तो अंतिम झालेला नाही. मात्र, तोच स्थायी समितीला या खेरदीची घाई झाल्याचेही दिसून येत आहे. कारण, स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत डस्टबीन खरेदीसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचे तरतूद वर्गीकरण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया करण्याचा पक्का निश्चिय अधिकारी आणि पदाधिका-यांनी केला असल्याचे दिसते आहे

Share this: