मुंबई-पुण्यात चोऱ्या करण्यासाठी विमानाने प्रवास , हायफाय चोरांस पोलिसांनी केले गजाआड

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करून चोरी करणाऱ्यास वाकड पोलिसांनी जेरबदं केले. त्याच्या आठ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. अनिल मिश्री राजभर (वय ३६, रा. ग्राम पोस्ट बोदरी, थाना चन्दवक, तहसील केरावत, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ जुलै रोजी अक्षय रवींद्र मिश्रा (रा. माऊली रेसिडन्सी, वाकड) यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातील नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरून नेला. त्यानंतर २५ जुलै रोजी मनिषा गणेश बन्ने (रा. मिडोज सोसायटी, थेरगाव) यांच्याही घरी चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घरातील १३.७ तोळे वजनाची सोन्याचे दागिने चोरून नेले. या दोन्ही चोऱ्या कडी कोयंडा उचकटून झाल्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली.

यापैकी पोलिस कर्मचारी विक्रात जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे, आणि तात्यासाहेब शिंदे हे सीसीटिव्हीची तपासणी करीत असतना त्यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उत्तरप्रदेशात जाऊन आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यामध्ये त्याने दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीकडून २५ तोळे वजनाचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी अनिल हा उत्तर प्रदेशातून घरफोडी करण्यासाठी विमानाने येत असे. शहरातील नामांकित हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस वास्तव्य करून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घरीफोडी करीत असे. चोरलेला मालाची शहरातच विल्हेवाट लावून पुन्हा तो उत्तरप्रदेशात विमानाने जात असे

Share this: