क्राईम बातम्याबातम्या

चिखली मोरेवस्ती येथे साई मंदिराचे कुलूप तोडून चोरी

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- मोरेवस्तीमधील साई कॉलनीमध्ये साई मंदिर आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी साई मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरात असलेली दोन हजार रुपये किमतीची दानपेटी, त्यातील रोख रक्कम आणि दोन पितळी निरंजन असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सदरील घटना मंगळवारी (दि. २०) सकाळी उघडकीस आली. दीपक कानिफनाथ गिरे (वय ३३, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत

Share this: