बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

भाजप कार्यालयाबाहेर नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर लावले शेण

पिंपरी ( वास्तव संघर्ष ) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फ्लेक्सवरीस नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शेण लावले. देहूरोड येथील बाजारपेठेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्स बोर्डवर जाणीवपूर्वक शेण लावले. ही घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पक्ष कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास निदर्शनास ही बाब आली. त्याने तत्काळ देहूरोड शहरातील भाजपचे पदाधिकारी तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तत्काळ फ्लेक्स हटवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

देहूरोड शहरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे, विशाल खंडेलवाल यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.महाराष्ट्र.याबाबत देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर म्हणाले की, या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक बारा आणि दुसरा तेरा वर्षाचा आहे. ही मुले खेळत असताना पायाला चिखल लागला. त्यानंतर चिखल काढत असताना बॅनरवरील फोटोस चिखल लागला गेला. यामागे कोणताही अनुचित प्रकार नसल्याचे मुले सांगत आहेत

Share this: