माझं पिंपरी -चिंचवडलेख-कविता

भाजपला मत देऊन पस्तावतोय.. अनोळखी व्यक्तींनी लावले शहरात प्लेक्स.. राजकीय वर्तुळात खळबळ

दिपक साबळे (वास्तव संघर्ष) :¬विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळेच आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड शहरात भाजपला टार्गेट करण्यासाठी प्लेक्स लावण्यात आले आहेत.

हे प्लेक्स कोण्या राजकारण्यांचे नसून सामान्य नागरिकांचे दिसतात ‘भाजपला मत देऊन पस्तावतोय …. अशा आशयाची टॅगलाईन असलेले हे प्लेक्स सर्वाचे लक्ष वेधत आहे.

महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार या आणि अशा आशयाचे फ्लेक्स लावत’ पाकिस्तानला शिव्या घालून कारचा हप्ता चुकणार नाही, मुद्द्याचं बोलल्यावर हे सरकार एकही दिवस टिकणार नाही.. अशी टॅगलाईन देऊन प्लेक्सवर भाजपला टोला मारला आहे.

हे प्लेक्स पिंपरी ते दापोडी चौकाचौकात लावले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना या प्लेक्सवर दिसून येत असून अनोळखी व्यक्तीने लावलेल्या या प्लेक्समुळे राजकीय वर्तुळात माञ खळबळ उडाली आहे. हा फ्लेक्स सामान्य नागरिकांनी लावला आहे की यामागे कुणी इच्छूक उमेदवार आहे याचं उत्तर मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. (वास्तव संघर्ष)

Share this: