महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा;पहा या तारखेस होणार मतमोजणी

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज झाली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घेतल्या जाणार आहेत.

राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज शनिवार (दि. २१) पासून महाराष्ट्र आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-

निवडणुकीची अधिसूचना :- २७ सप्टेंबर २०१९

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख :- ४ ऑक्टोबर २०१९

अर्जांची छाननी :- ५ ऑक्टोबर २०१९

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत :- ७ ऑक्टोबर

मतदान :- २१ ऑक्टोबर २०१९

मतमोजणी :- २४ ऑक्टोबर २०१९

Share this: