धक्कादायक :एकाच दिवशी दोघांची गळफास घेऊन आत्महत्या नागरिकांमध्ये खळबळ

पुणे (वास्तव संघर्ष) पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज धक्कादायक घटना घडल्या आहेत. एकाच दिवशी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे मृत्यू झाला आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर येथील जुना तोफखाना येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबरोबरच न्यायालयाच्या गेट क्रमांक एकसमोरील परिसरामध्ये एका तरुण कामगारानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दोघांचेही आत्महत्या करण्याबाबतचे कारण व वैयक्तीक माहिती अद्याप मिळालेली नाही.

Share this: