नको त्या अवस्थेत सासूने सुनेला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले ;सुनेने मग सासूचा खून केला

कोल्हापूर (वास्तव संघर्ष) कोल्हापूर शहरातील हलकर्णीमध्ये येथे एका २४ वर्षीय विवाहीतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचे बिंग फुटल्यामुळे आणि ‘नको त्या अवस्थेत सासूने सुनेला रंगेहाथ पकडले याचा राग आल्याने सासूचा खून करण्यात आला आहे दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील हलकर्णीमध्ये राहणाऱ्या संतोष मल्लाप्पा पाटील यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय असून, त्याची आरोपी पत्नी मालाश्री पाटील (वय-२४,राहणार कोल्हापूर) गडहिंग्लजमधील एका महाविद्यालयात पदवी शिक्षण घेते . त्या ठिकाणी तिचे एका तरुणाशी सूत जुळल्याचा संशय पती संतोषला होता. मालाश्री वारंवार फोनवर बोलत असल्यामुळे त्याने तिला अनेक वेळा समजही दिली.

रविवारी पती संतोष कर्नाटकात गेला असताना रात्री संतोषची पत्नी मालाश्री हिने 24 वर्षीय आरोपी प्रियकर रुपेश लब्यागोळ याला घरी बोलावले, मात्र मालाश्री आणि रुपेश यांना नको त्या अवस्थेत सासूने रंगेहाथ पकडले, त्यामुळे दोघही घाबरले. सासू म्हणाली ‘तुझा पराक्रम नवर्‍याला सांगते’ अशी धमकी सासूने सूनेला दिली. सासूने नवऱ्याकडे याची वाच्यता केल्यास अनर्थ ओढावेल, या भीतीने दोघांनी बसव्वा यांची डोक्यात लाकडी दांडका घालून निर्घृण हत्या केली. तर सासूच्या हत्येचा बनाव केला, आणि घरात दोघे घुसले माझ्यावर अतिप्रसंग केला आणि मध्ये सासू आल्याने त्यांना मारले असे पोलिसांना सुनेने सांगितले. मात्र पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली असता त्याने पत्नीवर शंका बोलून दाखवली, मग काय पोलिसांनी योग्य पद्धतीने विचारपूस केली आणि सुनेने सर्व बोलून दाखवले. बॉयफ्रेण्ड रुपेशच्या मदतीने सासूची हत्या केल्याची कबुली तिने दिली.

Share this: