मी फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती ;महाराष्ट्र शिवबाचा दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार नाही – शरद पवार

मुंबई (वास्तव संघर्ष) शिखर बँकेच्या तथाकथित भ्रष्टाचारप्रकरणी माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्याची माझ्या आयुष्यातील ही दुसरी घटना. १९८० साली जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती तेव्हा आम्हाला अटक झाली होती. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता हे दुसरे प्रकरण आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सागितले.

शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर आज, बुधवारी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीविधानसभा निवडणूक तोंडावर आहे. संपूर्ण महिनाभर मला निवडणूक प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे माझं वास्तव्य मुंबईच्या बाहेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळेस मी उपलबध नसल्यास मी अदृश्य ठिकाणी आहे असं ईडीला वाटायला नको म्हणून शुक्रवार, दि. २७ रोजी दुपारी २ वाजता मी स्वतः ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात जाणार आहे. ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे.

नक्की गुन्हा काय आहे, हे मला समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांना जी काही माहिती हवी असेल ती देईन, शिवाय अन्य काही पाहुणचार त्यांना करायचा असेल तर त्यासाठीही माझी तयारी आहे.मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही.असंही ते म्हणाले.

Share this: