शरद पवार आपण चौकशीसाठी येऊ नये भविष्यात चौकशीची गरज नाही, पवारांमुळे ईडी बॅकफूटवर

मुंबई (वास्तव संघर्ष) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सक्तवसुली संचलनालयात जाण्याचा चंग बांधून बसले असताना आता मात्र खुद्द ईडीलाच बॅकफूटवर यावे लागले आहे, ईडीने शरद पवारांना मेल करुन तूर्तास चौकशीची गरज नाही असे सांगितले आहे. शिखर बँकेत गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार होते. दुपारी 1 वाजता शरद पवार ईडीची कार्यालयात हजर राहणार होते, तसा मेल शरद पवार यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून ईडीच्या कार्यालयाला कळवले होते..

याच मेलला ईडीने उत्तर देत सांगितले की तूर्तास चौकशीची कोणतीही गरज नाही. परंतू काहीही असले तरी राष्ट्रवादीची भूमिका आहे की आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे कळत आहे.
इ. तसेच भविष्यात गरज लागेल तेव्हा तुम्हाला आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही उपस्थित रहावे. ईडीकडून अशा प्रकारचा मेल आल्याचा दुजोरा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला.

Share this: