त्या घोटाळ्यात पवारांचे नाव नाही, अण्णा हजारे यांची शरद पवार यांना क्लीनचीट

वास्तव संघर्ष आॅनलाईन – राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माज़ी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीत एकाच खळबळ उडाली. मात्र, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीं या घोटाळ्यात सादर केलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नसल्याचे सांगत पवार यांना क्लीनचीट दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अण्णा हजारे म्हणाले, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आपण सादर केलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव नव्हते, मग या प्रकरणी त्यांचे नाव आले कसे?. जर पुराव्यात त्यांच्या नावाचा समावेश नसेल तर त्यांचे नाव कसे आले याची सखोल चौकशी करावी. शरद पवारांवर खोटे आरोप कोणीही करू नयेत. तसेच या प्रकरणात त्यांना अडकवू नये, असेही हजारे यांनी सांगितले.

Share this: