बातम्या

शरद पवार हे राजकारणातील भीष्मपितामह आहेत – संजय राऊत

शरद पवार हे राजकारणातील भीष्मपितामह आहेत – संजय राऊत वास्तव संघर्ष आॅनलाईन – राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात.

णावाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादीकडून भाजप सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान, पवार हे राजकारणातील भीष्मपितामह असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवार यांचे समर्थन केले आहे.

राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यातील तक्रारदराने पवार यांचे नाव घेतलेले नाही, तरीही ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे बरोबर नाही. आमचा पक्ष आणि विचारसरणी वेगळी असली तरी पवार यांचे महाराष्ट्रातील काम व कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शरद पवारांना याआधीच क्लीनचीट दिली आहे. दरम्यान, पवार यांनी कार्यालयात येण्याची गरज नसल्याचे ईडीकडून त्यांना कळविण्यात आले आहे. मात्र, पवार आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात पाहुणचारासाठी जाणार आहेत

Share this: