पिंपरीतील भाटनगर येथील दारू भट्ट्यांवर पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने भाटनगर पिंपरी येथील दारू भट्ट्यांवर धडक कारवाई केली. यामध्ये दीड हजार लिटर दारू, साडेपाच हजार लिटर दारू निर्मितीचे रसायन व १५० लिटर ताडी असा एकूण ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा ऐवज नष्ट केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने गुरुवारी (दि. २६) सायंकाळी भाटनगर, पिंपरी येथे अवैधरित्या हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली. या कारवाईमध्ये पोलिसांनी १ हजार ५४१ लिटर दारू, ५ हजार ४३० लिटर दारू निर्मितीचे रसायन व १५० लिटर ताडी असा एकूण ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा ऐवज नष्ट केला. या कारवाईमध्ये ११ जणांवर मुंबई प्रोहिबिशन ऍक्‍टनुसार दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Share this: