बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गोपीचंद पडळकर यांना मारण्याचा फतवा काढणा-याला खपवून घेतलं जाणार नाही – अजित चौगुले

दिपक साबळे पुणे (वास्तव संघर्ष) धनगर समाजाचे नेते व वंचित बहूजन आघाडीचे माजी महासचिव मा श्री गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहूजन आघाडीचा राजीनामा दिला आहे.धनगर समाज आरक्षण प्रश्नावरून राजीनामा देऊन . वंचित आघाडीच्या नेतृत्त्वाशी कोणतेही वाद नसल्याचे जाहीर केले आहे.त्यानंतर धनगर समाजातील ही काही कार्यर्कत्यांनी पडळकर यांना विरोध केला आहे परंतु वंचित बहूजन आघाडीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.काल जय भीम सेना जालना यांनी पडळकर यांचा निषेध करून पडळकर यांना जोड्याने मारणारास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

याचा धनगर समाजाचे वतीने जाहीर निषेध.दलित नेते कवी मनाचे नेते रामदास आठवले, अविनाश महातेकर यांनी जय श्रीराम जय परशुराम म्हनूण भाजप वासी झाले.गायक आनंद शिंदे, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यासारखे अनेक नेते पवारांच्या मांडीवर बसले.यांचा जय भीम सेना जाहीर सत्कार करत आहे.धनगर समाज हा वंचित बहूजन आघाडीचा अविभाज्य घटक आहे.

मूळ पाया आहे धनगर समाज व अनेक नेते वंचित बहूजन आघाडी सोबत आहे . पडळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणी ही समर्थन केले नाही परंतु अशा प्रकारचे बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत . धनगर समाज व बौद्ध समाजामध्ये वाद काही संघटना पेटवत आहेत यांच्या पासून सावध रहावे असे सामाजिक कार्यकर्ते अजित चौगुले यांनी आवाहन केले आहे.

Share this: