वंचीतची यादी जाहीर :पिंपरीतून प्रविण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब

पिंपरी विधानसभेसाठी वंचितकडून बाळासाहेब गायकवाडांचे आव्हान

पिंपरी : (वास्तव संघर्ष ) गेल्या काही दिवसांपासून पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून कोण लढणार अशी चर्चा रंगू लागली होती. वंचितमधून ईच्छुकांची मोठी संख्या वाढली होती. त्यामुळे तिकिटाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या बाबत प्रत्येकालाच उत्सुकता लागली होती. मात्र प्रविण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली. तरूण चेहरा, तरूणांचे मोठे पाठबळ, उद्योगांमध्ये केलेली प्रगती व सर्वांमध्ये मिसळणारे नेतृत्त्व असल्याने त्यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

तिकिट जाहिर होताच पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व शहरातील सर्वच महापुरूषांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले.

वंचितला राज्यभर मिळालेल्या प्रतिसादानंतर अनेक इच्छुकांची रिघ वंचितकडे लागली होती. त्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने तयारीही केली होती. मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची माळ प्रविण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्याच गळ्यात पडली. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र फटाके वाजवून स्वागत केले जात आहे. सुरुवातीलपासूनच गायकवाड यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे वंचितकडून तिकिटही त्यांनाच मिळणार असा आशावाद त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. त्यामुळे त्यांच्यासह कार्यकर्तेही मतदारसंघात सर्वांना संपर्क करून आपल्या कामांना सुरूवात केली होती.

गायकवाड यांच्या भोवती तरुणांची मोठी फौज आहे. या बरोबरच उद्योग व्यवसायात त्यांनी केलेली प्रगती ही त्यांची जमेची बाजू ठरली. राजकारण केवळ प्रसिद्धीसाठी न करता त्याद्वारे सामाजिक कामे होऊन नागरिकांच्या हाताला रोजगार मिळावा, असे ध्येय गायकवाड यांनी उराशी बाळगले होते. त्याला राजकारणाचीही जोड मिळाली असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

पिंपरी मतदारसंघात बाळासाहेब गायकवाड यांचा मोठा गोतावळा आहे. तरूण चेहरा दिल्याने वंचित मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या बरोबरच पिंपरीमध्ये वंचितला मिळालेली मते, तरूणांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता असल्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Share this: