माजी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांची बंडखोरी शिवसेनेच्या चाबुकस्वारांसाठी डोकेदुखी

पिंपरी (वास्तव संघर्ष) विद्यमान खासदारांनी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना संपूर्ण मनाप्रमाणे ताब्यात घेऊन निष्ठावंत शेकडो शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी यांच्यावर अन्याय केला आहे.

व स्वाताचे व्यावसायिक भागिदारी आसणा-या पदाधिकारी नेमुन उमेदवारी दिली आहे. असा आरोप दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे याच पञकात दाखले म्हणतात नाराज शिववसैनिक आजी- माजी पदाधिकारी यांनी मला प्रत्यक्ष भेटुन व फोन वरून संपर्क करून उमेदवारी कायम ठेऊन धडा शिकवण्याचा आग्रह केला आहे.

तसेच पिंपरी विधानसभेतील मातंग समाजाच असलेले
४५,०००हजार ते ५०,०००हजार मतदान व शहरातील नाराज शिवसेना पदाधिकारी यांचा बेरजेचे गणित पहाता शिवसेना उमेदवार चाबुस्कवार यांचा पराभव होऊ शकतो.

मुळ शिवसेनेशी निगडीत असलेला विचार बाजुला ठेऊन खासदार प्राव्हेट लिमिटेड पक्ष होत चाललेला आहे.व तो रोखण्यासाठी शिवसैनिक असणाऱ्या युवराज दाखले यांना ताकत देऊन खासदारांना शह देण्यासाठी निणॕय घेण्यात आला आहे असे दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Share this: