राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांच्या खेळीने काॅंग्रेसची अवस्था ” ना घर का ना घाट का”

दिपक साबळे… पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवडमधील तीनपैकी एक जागा राष्ट्रवादीने न सोडल्याने शहरात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वाढली आहे.महाराष्ट्रात मिञ पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉग्रेस आघाडी असताना त्यांचा घरोबा शहरात कलह निर्माण करताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेत कॉंग्रेसला जागा न सोडता पुरस्कृत उमेदवाराला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने बिथरलेल्या कॉंग्रेसने त्यासाठी गृहित धरू नका, असा इशाराच आज पञकार परिषदेत काॅग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.

त्यामुळे दोन जागी उमेदवार देऊ न शकलेली राष्ट्रवादीची शहरात आणखी गोची झाली आहे .माञ आघाडी ही महाराष्ट्रात झाली असून तीनही जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडली आहे तरी देखील शहरातील काँग्रेसने ‘पुरस्कृत करताना आम्हाला विचारले का नाही असा आरोप केला आहे. परंतू शहरात एकही नगरसेवक नसताना राष्ट्रवादीवर आरोप करणा-या काॅग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का, दुश्मन अनाज का? या हिन्दी म्हणीप्रमाणे झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

शहराध्यक्ष सचिन साठे पञकार परिषदेत म्हणाले . ज्यांची पूर्वाश्रमीची आणि भावी वाटचाल जातीयवादी पक्षांच्या जवळ जाणारी आहे. त्यांना कॉंग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी बजावले. त्यांनी आपला रोख हा पुरस्कृत करण्याच्या राष्ट्रवादीच्या चाललेल्या हालचालींच्या दिशेने होता. 

पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड व भोसरीमध्ये काँग्रेसच्या परस्पर विधानसभेसाठी पुरस्कृत उमेदवार जाहिर करू नये, असे ते म्हणाले. त्यासाठी कॉंग्रेसला गृहित धरु नये, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. या दोन्हीही मतदारसंघात इच्छूक असूनही एकालाही उमेदवारी न देण्याच्या राष्ट्रवादीच्या गूढ चालीची सध्या शहरभर चर्चा आहे. कॉंग्रेसनेही या भूमिकेला आज लक्ष्य केलं.आघाडीचा धर्म पाळावा असा कॉंग्रेसच्या वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे. परंतु, ‘पुरस्कृत’ उमेदवाराला मदत करा, असा आदेश नाही,असे साठे यांनी सांगितले.

Share this: