पिंपरीतील महायुतीचे बंडखोर झाले थंड ;अमित गोरखे, भीमा बोबडे, चंद्रकांता सोनकांबळे यांची माघार

दिपक साबळे… पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार यानी विधानसभेत बंडखोरी केली होती माञ आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बंडखोरांचे बंड थंड झाले आहे.

यामध्ये भाजपचे अमित गोरखे भिमा बोबडे सह आरपीआय अपक्ष उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांनी माघार घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ‍ॅड गौतम चाबुकस्वार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे राजू दुर्गे अमोल थोरात आणि बबलू सोनकर उपस्थित होते.

दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जरी ही लढत होत असली तरी वंचीतचा खूप मोठा फटका यावेळी या पक्षाला बसू शकतो.

Share this: